Breaking News

1/breakingnews/recent

महावितरणच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चांचं आंदोलन

No comments

 


मुंबई -

मराठा समाजाला डावलून महावितरणकडून नोकरभरती सुरु झाल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जात आहे. महावितरणच्या नोकरभरती विरोधात आजही मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आले. महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदांकरता राज्यभरात दोन हजार उमेदवार भरायचे होते. त्यासाठी जुलै 2019 मधे ऊर्जा विभागाकडून जाहिरात काढण्यात आली होती. त्यानंतर इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली आणि त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे  पडताळणीसाठी मागवण्यात आली.

 पंरतु दरम्यानच्या काळात सप्टेंबर 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे उर्जा विभागाने मराठा समाजातील उमेदवारांना वगळून इतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करायचे ठरवले. परंतु हा अन्याय असल्याचा आरोप करत महावितरणची भरती प्रक्रिया तातडीने थांबवावी आणि दोन दिवस होणाऱ्या कागदपत्र पडताळणीत मराठा समाजालाही सामावून घ्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तरीही प्रक्रिया सुरु राहिली तर आंदोलन हिंसक होईल असा इशाराही देण्यात आला.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *