ईडीनंतर भाजपा कार्यालयाबाहेर झळकले बोर्ड: येथे भाजपाविरोधी लोकप्रतिनिधींना
मुंबई -
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्या शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रीया उमटलीत शिवसैनिक आक्रमक झाले. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद भाजपावर हल्ला चढवला होता. तर शिवसैनिकांकडून ईडी कार्यालयाबाहेर भाजपाचे बॅनर लावण्यात आलं. या बॅनरनंतर भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेरही ईडी कार्यालय असल्याचं बॅनर लावण्यात आले आहे. संतप्त शिवसैनिकांनी काल (२८ डिसेंबर) ईडीच्या कार्यालयाबाहेर भाजपा प्रदेश कार्यालय असल्याचं बॅनर लावले होते. त्यानंतर रात्री उशिरा भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर अशाच स्वरूपाच बॅनर लावण्यात आले. ते कुणी लावलं हे स्पष्ट झालेले नाही.
मात्र, शिवसैनिकांनी लावले असावे, असे बोलले जात आहे. भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवर अमलबजावणी संचालनालय’ असे सुरूवातीलाच लिहिले आहे. त्यानंतर “येथे भाजपाविरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात. पत्रकार सोहित मिश्रा यांनी या बॅनरचा फोटो ट्विट केला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांची चौकशी सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे शिवसेना संतापली असून, संजय राऊत यांनीही आक्रमक पवित्रा घेत भाजपाला धारेवर धरले आहे.

No comments
Post a Comment