Breaking News

1/breakingnews/recent

राजू शेट्टीं सोबत कधीही चर्चा करण्यास तयार: चंद्रकांत पाटलांचे आव्हान

No comments


मुंबई

 त्याचबरोबर भारत बंद कायद्यांची होळी करत विरोध दर्शवला शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून देशातील वातावरण तापले असून, राज्याच्या राजकीय वर्तुळातही आरोपांच्या कुरघोड्या सुरूच आहेत. कृषी विधेयकावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.शेट्टी यांच्याकडून केल्या जाणाऱ्या टीकेला पाटील यांनी उत्तर दिले आहे. त्याचबरोबर कायद्यांबद्दल राजू शेट्टी यांच्यासोबत कधीही चर्चा करण्यास तयार आहे असे  आव्हान पाटील यांनी शेट्टी यांना दिले आहे.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि महाविकासआघाडी तील हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी सुरू आहे. काल मुश्रीफ व सतेज पाटील यांनी चंद्रकांत दादांना लक्ष्य केले होते. 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन नेत्यांचा मंगळवारी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार आहे. पण यातून दलाली घटन्याची भीती वाटणाऱ्या मध्यस्थांना भीती वाटत आहे. त्यातून हे आंदोलन तापवले जात आहे, असा आरोप पाटील यांनी केला. आज आंदोलनावेळी राजू शेट्टी यांनी कृषि विधेयकावर चंद्रकांत पाटील यांच्याशी कोल्हापुरात जाहीरपणे चर्चा करण्याची तयारी दर्शवली. त्यावर आमदार पाटील यांनी पत्रकार संघटनेने सारख्या चांगल्या संस्थांनी पुढाकार घेतला तर चर्चेची तयारी आहे, असे उत्तर त्यांनी दिले. 


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *