Breaking News

1/breakingnews/recent

भाजप नेत्यांना शरद पवारांच्या मध्यस्तीची अपेक्षा?

No comments



मुंबई -

मेट्रो कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याच्या वृत्तावर प्रवीण दरेकरांनी भाष्य केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत, पण तरीही त्यांच्यावर विश्वास आहे. जो काय निर्णय ते घेतील, तो व्यवहारी दृष्टिकोनातूनच घेतील आणि मुख्यमंत्र्यांना समजावून सांगतील असा विश्वास भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. 

कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकल्पावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून कांजूरमार्गच्या जागेवरील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केले. केंद्राचे आणि राज्याने एकत्र बसून वाद सोडवला तर जनतेची जागा त्यांच्याच वापरात येईल. मग खेचाखेची का? या बसा आणि चर्चा करा अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्राला पर्यायाने भाजप नेत्यांना चर्चेचं आवाहन केले. कारशेडवरील तोडग्यासाठी मध्यस्थी करण्यास शरद पवार तयार असल्याची माहिती आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *