Breaking News

1/breakingnews/recent

चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा - संजय राऊत

No comments


मुंबई 

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे, अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे  यांचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक शैलीत समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याची पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. आपण चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

 रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की जर केंद्राचा एखादा मंत्री अशी माहिती देत असेल तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चीन आणि पाकिस्तानावर लगेच सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे. जर आपल्या देशात बाहेरची शक्ती, हात अस्थिरता, अशांतता निर्माण करत असतील तर राष्ट्रभक्त असल्याच्या नात्याने शिवसेना हे वक्तव्य फार गांभीर्याने घेत आहे. संरक्षणमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि लगेच चीन-पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला पाहिजे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *