सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - जरे खून प्रकरणातील सागर भिंगारदिवे याच्या घराची झडती CCTV फुटेज केले जप्त
News24सह्याद्री -
रेखा जरे यांची हत्या करण्यासाठी जे धारदार शस्त्र वापरण्यात आले ते शस्त्र पोलिसांनी मारेकऱ्यांकडून जप्त केलेआहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे याच्या घराची पोलिसांनी आज झडती देखील घेतली आहे. तसेच सागर भिंगारदिवे याच्या घरात मधील सीसीटीव्हीचे फुटेजही हस्तगत केल्याची माहिती हाती आली आहे ,या सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना या प्रांतातील काही धागे दोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे . त्यामुळे हे प्रकरण आता कोणत्या दिशेला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे , दरम्यान , या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे हा अद्याप पसार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
No comments
Post a Comment