Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - सहा दिवसांपूर्वीच होणार होता रेखा जरे यांचा अपघाती मर्डर

No comments

    News24सह्याद्री -




रेखा जरे त्यांचा सहा दिवसांपूर्वीच अपघाती खून होणार होता. मात्र, तो डाव फसला होता. याची सुपारी देखील बाळ बोठे यानेच दिली होती अशी धक्क़ादायक माहिती आरोपींकडूनच पोलिसांना मिळाली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या माहितीस दुजोरा दिलाय!सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मास्टरमाईंड बाळासाहेब जगन्नाथ बोठे हाच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुणे रस्त्यावर जातेगाव घाटात सोमवारी म्हणजेच दि. ३० नोव्हेंबर रोजी जरे यांची हत्या झाली. मात्र, त्याआधी सहा दिवसांपूर्वी म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांचे हत्याकांड होणार होते.जरे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवून त्यांचा काटा काढण्याचा डाव बोठे यानेच आखला होता. त्यासाठी त्याने श्रीरामपूर येथील मारेकरी फिरोज शेख याचा टेम्पो पाहिला. या टेम्पोची विमा पॉलिसी संपली होती. महिनाभरापूर्वीच बोठे याने त्या टेम्पोची पाहणी केली. फिरोज शेख याने विमा पॉलिसी नसल्याची बाब सागर भिंगारदिवे यास सांगितली. भिंगारदिवे याने ही बाब बाळ बोठे यांना सांगितली. 

बोठे याने विमा पॉलिसीेचा हप्ता भरण्यासाठी म्हणून भिंगारदिवे याच्याकडे २६ हजार रुपये दिले. यानंतर दुसर्‍या दिवशी फिरोज शेख याने विमा पॉलिसीची रक्कम भरली.दि. २४ नोव्हेंबर रोजी रेखा जरे त्यांच्या कामासाठी करंजी घाट मार्गे पाथर्डीला निघाल्या. ही माहिती बाळ बोठे यांना होतीच! करंजी घाटातून त्या व त्यांची सहकारी मैत्रीण अशा दोघी चार चाकी वाहनातून जाऊ लागल्या. त्यांच्या गाडीच्या मागे फिरोज शेख, गुड्डू शिंदे व ऋषीकेश पवार असे तिघे टेम्पो घेऊन राहिले. करंजी घाट सुरु झाल्यानंतर जरे यांच्या चारचाकी वाहनाला पाठीमागून जोराची धडक द्यायची आणि त्यांची गाडी खोल दरीत पाडायची असा हा प्लॅन होता. मात्र, घाट सुरू होताच पाठीमागून दुसरे चार चाकी वाहन आले. जरे यांची सँट्रो गाडी, त्यामागे टेम्पो असे चालले असताना पाठीमागून आलेल्या दुसर्‍या चार चाकी वाहनाने टेम्पोला ओव्हरटेक केले. याच दरम्यान, समोरुन दुसरी गाडी आल्याने ही इर्टिगा गाडी जरे यांच्या सेंट्रो गाडी आणि टेम्पोच्या मध्ये आली. जरे यांच्या सँट्रो आणि टेम्पोच्या मध्ये आलेली ही गाडी घाट संपला तरी पुढे गेली नाही. घाट संपला. मारेकर्‍यांचा हा टेम्पो तसाच जरे यांच्या गाडीच्या मागे राहिला. करंजी हे गाव आल्यानंतर जरे या तिथे नाष्ट्यासाठी थांबल्या आणि टेम्पो पुढे गेला. रेखा जरे यांच्या गाडीच्या आणि टेम्पोच्या मध्ये दुसरी चार चाकी आली नसती तर जरे यांचा अपघाती मृत्यू अशा मथळ्याखाली बातम्या आल्या असत्या. 

टेम्पो चालक स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला असता आणि अपघाती मृत्यू या नावाखाली जरे यांची श्रद्धांजली सभा त्याआधीच झाली असती. मात्र, त्यावेळी त्यांचे दैवबलवत्तर निघाले.यात आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीय! रेखा जरे या करंजीत नाष्ट्यासाठी थांबल्या त्यांच्या मोबाईलवर बाळ बोठे यांचा फोन आला आणि करंजीत नाष्टयाला थांबलीस का? तुझ्या गाडीच्या बाजूला पांढर्‍या रंगाची चारचाकी या या नंबरची गाडी थांबलीय का असे थेट प्रश्‍न बोठे याने तिला केले होते. त्यावर रेखा जरे या आश्‍चर्यचकीत झाल्या होत्या. कारण बोठे तर नगरला आहे, मग त्याला इतकी डिटेल माहिती कशी आणि कोणी दिली याचा विचार त्या करू लागल्या असतील! मात्र, ही सारी माहिती फिरोज शेख यानेच बाळ बोठे याला दिली होती आणि टेम्पोच्या मध्ये दुसरी गाडी आल्याने काहीच करता आले नाही असेही सांगितले.





No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *