Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - पोलिसांच्या हातावर तुरी देत असा पसार झाला बाळ बोठे

No comments

     News24सह्याद्री -



सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या करणारा कथीत पत्रकार बाळ बोठे हा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत असले तरी रेखा जरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईपर्यंत जरे यांच्या नातेवाईक, मित्र परिवारात लुडबुड करणारा बोठे त्याच दिवशी दुपारी पसार झाला. मात्र, पोलिसांना त्याचे मोबाईल लोकेशन त्याचे घर दिसत होते. हत्यारा बाळ बोठे नेमका कसा पसार झाला आहे. आपल्याकडून अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आलीय! क्राईम रिपोर्टर ते कार्यकारी संपादक असा प्रवास करणारा बाळ बोठे पाहता पाहता सुपारीखोर झाला. एका महिलेची सुपारी देऊन हत्या केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाय! पत्रकारीतेसाठी ही अत्यंत खेदजनक घटना आहे. रेखा जरे यांचे हत्याकांड घडल्यानंतर दुसर्‍या क्षणापासून रेखा जरे यांचा जीव वाचविण्यासाठी मदत करण्याचे नाटक करणारा बोठे पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. जरे यांना नगरला येण्यासाठी सुपा गावातून अँम्बुलन्स उपलब्ध करून देण्यापासून त्याने व्यवस्था केली. रुग्णवाहिका नगरमध्ये सरकारी दवाखान्यात आली असता रुग्णालयाच्या दारातच बाळ बोठे उभा होता. 

जरे यांना मृत घोषीत केल्यानंतर जरे यांची आई, त्यांचा मुलगा यांचे सांत्वन करणे, त्यांना मीठी मारुन रडणे, जरे यांच्या मोठ्या मुलाला फोन करणे, मोठा रुग्णालयात आल्यानंतर त्याची समजूत घालणे, दोन्ही मुले आणि आई यांच्याशी पोलिस बोलू लागले की त्यांच्याजवळ जाऊन उभे राहणे असे सारे प्रकार बोठे करत होता आणि पोलिस हे सारे न्याहाळत होती. रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटलमध्ये थांबून सकाळी सात वाजताच पोस्टमार्टेम रुमच्या बाहेर त्याने हजेरी लावली. अमरधाममध्ये अंत्यविधीची व्यवस्थाही त्यानेच केली. अमरधाममध्ये आलेल्या अनेकांचे त्याने सांत्वनही केले. जरे यांनी दुचाकीस्वाराला शिव्या दिल्या, त्यातून शाब्दीक चकमकही झाली, ते दारु प्यायलेले पोरं होते आणि त्यांनीच मग रागाच्या भरात चाकू मारला अशी स्टोरी बोठे अमरधाममध्ये अनेकांना सांगत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा गुन्हेगारी चेहरा समाजासमोर आणलाच! बाळ बोठे हाच मास्टरमाईंड आणि सुपारी देणारा असल्याची खात्री पटल्यापासून पोलिस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. पोलिस खात्यातील काही कर्मचार्‍यांशी त्याचे घनिष्ठ संबंध आजही आहेत! हेच संबंध त्याने कामाला आणले. ‘तू आरोपी होणार आणि आरोपींनी तुझे नाव घेतलंय’, हे बोठे यास समजले आणि लागलीच त्याने हालचाली सुरू केल्या.

 सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या झाल्यानंतर मास्टरमाईंड हत्यारा बाळ बोठे याने त्याचे दोन्ही मोबाईल घरी ठेवले. पोलिस आपल्या मागावर असल्याच्या त्याला समजले होते. त्यामुळे त्याने डोकं चालवलं. दोन्ही मोबाईल बंद न करता चालूच ठेवले. कोणाचे फोन आले तर घ्या, असं घरच्यांना सांगितले आणि काही कामानिमित्त बाहेर चाललोय असं सांगितले. पोलिस त्याच्या मोबाईलचे लोकेशन घेऊन त्याच्यावर लक्ष ठेवून होते. मोबाईलचे लोकेशन त्याचे घर दिसत होते. तो राहत असल्याच्या परिसरात सिव्हील ड्रेसवर पोलिस पहारा देऊन होते. त्याचे दोन्ही मोबाईल, त्याची दुचाकी, चारचाकी ही वाहने बंगल्याच्या पार्कींगमध्येच होती. वाहने बंगल्याच्या पार्किंगमध्ये आणि त्याच्या मोबाईलचे लोकेशनही बंगल्यातच पोलिसांना मिळत होते. पोलिसांचा त्याच्यावर वॉच होता. प्रत्येक एक तासाला पोलिस त्याच्या मोबाईलचे लोकेशन घेत होते आणि ते लोकेशन त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील जिद्द बंगल्याचे दिसत होते. शेवटच्या क्षणी बाळ बोठे यास अटक करण्यासाठी पोलिसांची टीम गेली. मात्र, बोठे घरात नव्हता. त्याचे दोन्ही मोबाईल घरातच होते. त्यावर आलेले फोन त्याची मुले आणि पत्नी घेत होते. आदल्या रात्रीपासून बोठे घरी नसल्याचे त्याच्या घरातून सांगितले गेले. एका मित्राच्या काळ्या काचा असणार्‍या चार चाकी वाहनात बसून बोठे पसार झाला आणि पोलिस आता त्याचा शोध घेत आहेत.  



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *