Breaking News

1/breakingnews/recent

'त्या' वक्तव्याबद्दल दानवेंना युवक काँग्रेस जाब विचारणार- सत्यजीत तांबे

No comments


अहमदनगर । नगर सह्याद्री -

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मागेही शेतकर्‍यांविषयी अपशब्द वापरले होते. आताही ते शेतकरी आंदोलन भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे धक्कादायक वक्तव्य करुन त्यांनी शेतकर्‍यांचा अवमान केला आहे. यावरुनच शेतकर्‍यांबद्दल मंत्री दानवे यांना किती आपूलकी आहे हे दिसून येते. या वक्तव्याबद्दल मंत्री दानवे यांना त्यांच्या निवासस्थानी जावून शुक्रवार दि. 11 रोजी युवक काँग्रेस जाब विचारणार असल्याची माहिती महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 

दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. विविध संघटना, पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलन चिघळत चालले आहे. असे असतांना शेतकर्‍यांच्या मुद्द्यावर चर्चा करायला मोदी सरकारला वेळ नाही. त्यातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य केले. यावक्तव्यावरुन दानवे यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. 



शिर्डीकरांचा मुद्दा रास्त - सत्यजीत तांबे 

शिर्डीमध्ये लावण्यात आलेल्या फलकाबाबत मी नगराध्यक्ष, ग्रामस्थांची चर्चा केली असून शिर्डीकरांचा मुद्दा रास्त आहे. भाविकांची कपडे अंगप्रदर्शन होणारे नसावे असा त्यांचा मुद्दा आहे. कोणते कपडे घालावे असे कुठलेही बंधण त्यामध्ये घातलेले नाही. त्यामध्ये फक्त व्यवस्थित कपडे घालावे असे म्हणणे आहे. याबाबत शिर्डी संस्थानला विनंती केली असून शिर्डीत कशा प्रकारचे कपडे घालून आले पाहिजे याची जनतेमध्ये सविस्तर जनजागृती करावी. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *