Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - ड्युटीवरील पोलिसांना दांडक्याने मारहाण

No comments

   News24सह्याद्री -





मोठी बातमी कायद्याचे रक्षकच सुरक्षित नाही याची जाणीव करून देणारी एक मोठी बातमी पाहणार यवत नेवासा  तालुक्यातील कुकाणा येथे एका तताकथीत डॉन ने थेट पोलिसांनाच लाकडी  दांडक्याने मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला प्रकाश उर्फ बाळू साळुंके असे पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे , विना मास्क फिरणाऱ्या या साळुंकेला पोलिसांनी मास्क का घातला माही अशी  विचारणा  केली होती ,यावर  बाळू साळुंके याने थेट पोलिसांना शिवीगाळ करत धक्का बुक्की केली ,व घनास्थळावरून पसार झाला . मात्र हे प्रकरण एवढयावरच थांबले नाही , थोड्या वेळाने हा तताकथीत डॉन  लाकडी दांडके घेऊन पुन्हा आला , व पोलिसांना बेदम मारहाण केली . या दरम्यान आपण कुकण्याचा डॉंन असून ,माझी पावती फाडता का असा असा दमही या आरोपीने  पोलीस  कॉन्स्टेबल अमोल बुचकुल आणि त्याच्या बरोबर असलेल्या पोलीस आणि होमगार्डला भरला व मारहाणही केली . 

या घटने नंतर  पोलिसांनी जास्तीची कुमक मागवून आरोपी  तताकथीत डॉन साळुंकेला पकडले मात्र पोलिसांना कायदा शिकवायची आणि त्यांच्यावर हात उचलायची हिम्मत हि गुंड प्रवृत्तीची माणस करतात कुणाच्या जीवावर ? अश्या गुंडाना पाठीशी  घालत नेमकं  पोसतय कोण हा मोठा प्रश्न आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आता जिल्ह्यात स्थिरावले आहेत आता त्यांनी आपल्या कामाची  चुणूक दाखवणे गरजचे आहे असे  तताकथीत डॉन आणि त्यांच्या बगलबच्य्याना पोलिसीखाक्या दाखवून वर्दीचा मान सन्मान राखणे आता पोलीस अधीक्षकांच्या हातात आहे , तेव्हा हे प्रकरण पोलीस अधीक्षक कसे हाताळतात हे पाहने महत्वाचं ठरणार आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *