दिवाळी स्पेशल - सर्वासाठीच आनंदाची पर्वणी घेऊन येणारा सण 'वसुबारस'
News24सह्याद्री -
दिवाळी हा सण सर्वासाठीच आनंदाची पर्वणी घेऊन येणारा सण आहेआकाश कंदिलाचा प्रकाश ,सुंघदी उटन आणि खमंग फराळाची मेजवानी घेऊन येणारा हा उत्सव ,सोबतच आनंद आणि मांगल्य घेऊन येतो लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना या सणाची उत्सुकता असते..दारी तोरण, रांगोळी ,,खमंग फराळ,. मिठाई ,फटाक्यांची आतिषबाजी ,आणि जगमगता आकाशकंदील सगळं काही घेऊन येते ही आपली दिवाळी ...... अश्या या दिवाळीचा आज पहिला दिवस
आज वसुबारस पाच दिवस चालनारा दिवाळी उत्सव तील हा पहिला दिवस .....
आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.अशी कथा आहे की समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या.
त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहे तेवढे वर्ष स्वर्गात वास व्हावा या कामनांपुरतीसाठी ही पूजा केली जाते.तसेच असे म्हणतात की या दिवशी श्री विष्णूंची आपतत्त्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते. ह्या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अवतरित करते. म्हणून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गायीची पूजा केली जाते.आपला देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणार्या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
No comments
Post a Comment