मोठी बातमी - डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमागील सत्य
News24सह्याद्री -
गेल्या काही महिन्यांपासून आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येताहेत , अश्यातच आता पुन्हा एक धक्का देणारी आत्महत्येची घटना समोर आली आहे , आमटे घराण्यातल्या तिसर्या पिढीतील डॉक्टर शीतल आमटे करजगी यांनी आत्महत्या केली आहे आहे . शीतल यांनी विषारी इंजेक्शन टोचून घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची प्रार्थमिक माहिती समोर आली आहे . आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ असणाऱ्या शीतल आमटे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होत्या, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाइव्हनंतर उलट सुलट चर्चांना उधाण आले होते . त्यानंतर आमटे कुटुंबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. तर 'संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटेंच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिले आहे. तथापि, त्या सध्या मानसिक ताण, नैराश्याचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुलीही दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करीत आहे,' असं त्या निवेदनात स्पष्ट केलं होतं.
त्यांनतर काही दिवस हा वाद थोड्या फार प्रमाणात चर्चेचा विषय बनत होता मात्र त्यामुळे डॉ शीतल या मानसिक तणावाखाली असल्याचं समजतंय आणि त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलत आपली जीवन यात्राच संपवली . कुष्ठरोग्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवणार्या शीतल यांची अचानक एक्झिट हि आमटे परिवारासह सर्वानाच मानाला चटका लावून जाणारी आहे .
No comments
Post a Comment