महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, आम्ही सुडाचे राजकारण करत नाही : संजय राऊत
News24सह्याद्री -
मुंबई -
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामीला अटक केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. अर्णव गोस्वामीच्या अटकेवर विशेषकरून भाजप ठाकरे सरकारवर कडाडून टीका करताना दिसत आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अर्णवरील कारवाईचा राज्य सरकारशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. आम्ही सुडाचे राजकारण करत नाही, असे म्हणत राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.
याच दरम्यान राऊत पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या कायद्याच राज्य आहे. इथे बदल्याच्या भावनेने कारवाई होत नाही. कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलीस त्याच्याविरोधात कारवाई करतील, तसेच पोलिसांकडे सबळ पुरावे असतील, त्यामुळेच त्यांनी कारवाई केली असेल, अससे ही त्यांनी म्हटले आहे. 'इथे कायद्याने काम चालते. जर आमच्याकडून काही चुकले असेल तर कायदा आम्हालाही सोडणार नाही. त्या कारवाईचा सरकार किंवा एखाद्या पक्षाशी संबंध असल्याचे कोणते ही कारण नाही, 'असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
YOU MAY ALSO LIKE
Thane

No comments
Post a Comment