Breaking News

1/breakingnews/recent

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी सुनील केदार यांची वर्णी लागणार

No comments

  News24सह्याद्री  -



मुंबई -  

बिहार विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्र काँग्रेस मध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष पदी महाविकास आघाडी सरकारमधील दिग्गज नेते आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांची विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी निवड होण्याची चर्चा आहे.

काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचीही नावं होती. मात्र सुनील केदार यांच्या खांद्यावर राहुल गांधी जबाबदारी टाकण्याची चिन्हं आहेत. राहुल गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जानेवारी महिन्यात निवड होण्याचे संकेत आहेत. राहुल गांधी यांच्या नवीन टीममध्ये युवकांना प्राध्यान्य देण्यात येणार आहे. त्याआधी सुनील केदार यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *