Breaking News

1/breakingnews/recent

देवेंद्र फडणवीस यांनी लगावला टोला,अजितदादांचं नेमकं दुखणं काय

No comments


मुंबई 

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच नेमकं काय दुखणं आहे, हे मला चांगलं माहित आहे' असे म्हणत भाजपच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती होत आहे. तर दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.'ईडी तपासाचा भाग पूर्ण करेल. पण, प्रताप सरनाईक हे ईडीला समोर का जात नाहीत. ते सेनेच्या नेत्यांशी भेटता, चर्चा करतात आणि नंतर क्वारंटाइन होतात. त्यामुळे त्यांनी न घाबरता ईडीला सामोरे गेले पाहिजे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

संजय राऊत यांनी काल सांगितले होते की, 100 नेत्यांची यादी केंद्राकडे पाठवणार आहे आणि आज राऊत म्हणाले की, आधी चौकशी होऊ द्या, मग यादी पाठवतो. आम्हीपण त्यांच्या यादीची वाट पाहत आहोत त्यांना जेव्हा यादी पाठवायची आहे, त्यांनी पाठवावी. 'कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी गाजर द्यावी लागतात, भाजप नेत्यांकडून काड्या पेटवण्याचे काम केले जात आहे', असा टोला अजित पवार यांनी लगावला होता. 'मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सरकारला अपयश आले आहे. फक्त वेळकाढूपणा सुरू असल्यामुळे सगळेच विद्यार्थी भरडले गेले आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. मुलांचे नुकसान होता कामा नये' असे फडणवीस म्हणाले.'पदवीधर निवडणुकीमध्ये बोगस मतदान नोंदणीचा आरोप म्हणजे जयंत पाटलांनी केला आहे. त्यांनी एका प्रकारे पराभव मान्य केला आहे. मुळात याला कव्हर फायरिंग म्हणतात, कारण इथे एव्हीएमला दोष देण्यासाठी जागा नाही. त्यामुळे त्यांना पराभव समोर दिसत आहे', असा टोलाही फडणवीस यांनी जयंत पाटलांना लगावला.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *