Breaking News

1/breakingnews/recent

ठाकरे सरकारने सद्सदविवेक बुद्धी गहाण ठेवली का? : देवेंद्र फडणवीस

No comments



मुंबई - 

न्यायालयाच्या या दोन्ही निकालांवरुन फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. अभिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर केलेली कारवाई अवैध ठरवल्याच्या न्यालयाच्या निर्णयाचं स्वागत करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.''एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एकाप्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारे आहे. आता प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सुद्ध हे महाराष्ट्रद्रोही ठरविणार का?'', असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. 

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन न देने चूक असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने आज कंगना राणौतच्या कार्यालयावरील महापालिकेची कारवाई अवैध असून नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिले. ''आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे. याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलीस, फौजदारी कायदे हे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, ते छळवणुकीसाठी नाहीत. हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सदसदविवेकबुद्धी- संविधानाला स्मरुन घेतलेली शपथ गहाण ठेवली का? हा प्रश्न निर्माण होतो. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *