Breaking News

1/breakingnews/recent

उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेंचा - श्री क्षेत्र मोहटा देवस्थानच्या श्री रेणुकामातेचा महिमा

No comments

    News24सह्याद्री -                                    
माहूरगड निवासिनी श्री रेणुकामातेचा अंशावतार म्‍हणजेच श्री मोहटादेवी रेणुका माता होय . श्रीक्षेत्र मोहटादेवी गडाचा परिसर म्‍हणजे गर्भगिरी पर्वत रांगेतील होय. याच रांगेतील मोहटा गावालगतच्‍या उंच अशा डोंगरावर श्री रेणुकामातेने अवतार धारण केला. पूर्वीच्‍या काळी श्री नवनाथांनी शाबरी विद्या कवित्‍व सिद्धीसाठी भगवान श्री वृद्धेश्वर आदिनाथांना प्रसन्‍न करुन एक महायज्ञ केला. यज्ञेश्‍वरी श्रीशाबरी देवी प्रसन्‍न झाली त्‍यावेळी सर्व ऋषीमुनी देवगणांनी व नाथांनी आपल्‍या दिव्‍य सामर्थ्‍यांनी देवीस पाचारण केले. तेव्‍हा देवीने नाथांना कवित्‍वाचे वरदान दिले. 

प्रार्थना केली. देवीने तथास्‍तु म्‍हणून वरदान दिले. तिथेच भगवान श्री वृध्‍देश्‍वराचे स्‍वयंभू लिंग आहे. शेजारीच श्री मत्‍स्‍येन्द्रनाथ मायंबा व श्री कानिफनाथ मढी यांचे संजीवन समाधी स्थानआहे. अजूनही मोहटा देवी बाबत अनेक इतिहास आहे  बन्‍सीबाबा दहिफळे यांना सुद्धा देवीने साक्षत्कार दिला होता असेही इतिहासात नमूद आहे पाथर्डी पासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हे गाव असून नवरात्री उत्सवात दरवर्षी अहमदनगर जिल्ह्यासह राज्यबहारतुन अणे भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात . 

तर काही भक्त नऊ दिवस उभे घट बसवले जातात काठीच्या आधारे अथवा भिंतीच्या आधारे नऊ दिवस हे भक्त उभे राहून देवीची आराधना करतात बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर हे गाव असल्याने मराठवाड्यातून अनेक भक्त पायी दर्शनासाठी मोहटागडावर येत असतात नवरात्री चे नऊ दिवस मंदिर परिसरात उत्सहाचे वातावरण असते नवसाला पावणारी श्री मोहटादेवी रेणुकामातेच्‍या दर्शनासाठी भक्‍तगणांची वाढती संख्‍या, पुरातन असलेल्यामंदीराचीअवस्‍था, भावीकांसाठी सर्वसुखसोयी इत्‍यादी बाबींचा विचार करुन पुरातन मंदीराचा जीर्णोद्धार होऊन नूतन श्रीयंत्राधार मंदीराची उभारणी करण्‍यात आली. श्री यंत्रातील वृत्‍तत्रयानुसार नुतन मंदीरामध्‍ये तीन दर्शन रांगेची रचना करण्‍यात आली आहे
                                                          
No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *