Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - पोलीस निरीक्षक वाघचा पत्ताच लागेना ?

No comments

   News24सह्याद्री  - पोलीस निरीक्षक वाघचा पत्ताच लागेना ?....पहा सह्याद्री स्पेशल रिपोर्ट मध्येअहमदनगर शहरात पोलिसांच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना घडलीय, थेट एका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरक्षकावर महिलेने अत्याचाराचा आरोप लावला होता. या बाबत तिने पोलीस अधीक्षक, गृहमंत्री , मुख्यमंत्री यांच्या कडे तक्रार हि केली. मात्र त्या पोलीस निरीक्षकावर आधी फक्त बदली ची कारवाई करण्यात अली ती बदली म्हणजे फक्त देखावा होता. कारण त्या पोलीस निरीक्षकाला आर्थिक गुन्हे शाखेला पाठवून तत्कालीन अधीक्षकांनी त्याला बढती दिल्याचाच प्रकार होता . या नंतरही तो वाघ शांत बसलाच नाही त्याने त्या पीडित महिलेला त्रास देणे सुरूच ठेवले. वेळो वेळी धमकावून अनेक खोटेनाटे पत्र तयार करू स्वतःची सुटका करून घेण्याचे त्याने बरेच प्रयत्न केले खरे, मात्र अखेर त्या महिलेच्या तक्रारीची दाखल घेतली गेली आणि पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला.  आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची  खबर मिळताच हा वाघ फरार  झाला. 

जर आपण पोलिसांची कामाची पद्धत पहिली तर संताप येतो कारण पीडित महिला अनेक दिवसापासून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी चकरा मारत होती . मात्र तरीही त्याची दखल लवकर घेण्यात अली नाही पीडित महिलेने अनेकांची  दारे ठोठावली तेव्हा तिचा आवाज पोलिसाना ऐकू गेला आणि तिची तक्रार नोंवून घेण्यात आली . मात्र त्याच वेळी आरोपी विकास वाघ ला याबाबत  खबर मिळाली आणि तो पळाला जर त्याच्या जागी  कोणी सामान्य माणूस असता तर असे झाले असते का  असा प्रश्न निमित्ताने आला आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *