सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - राज्यातील आठवडी बाजार गुरुवार, दि. १५ पासून होणार सुरू

News24सह्याद्री -
मिशन बिगीन अगेन, अंतर्गत राज्य शासनाने लॉक डाऊनमध्ये शिथीलता आणण्यास प्रारंभ केला आहे. त्याच अंतर्गत आज राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या सहीने आदेश काढण्यात आले असून त्यानुसार लोकल आठवडी बाजारांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दि. १५ ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून राज्यातील सर्व प्रकारचे आठवडी बाजार सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. यामध्ये जनावरांचा आठवडे बाजार देखील सुरू होणार आहे. मात्र, आठवडी बाजार भरत असलेल्या ठिकाणी कन्टेनमेंट झोन नसला पाहिजे. आठवडी बाजार सुरू करताना संबंधित बाजार समित्यांनी स्थानिक लोकल प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे.
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक आणि खासगी क्लासेस हे दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. याशिवाय विवाह समारंभात मंगल कार्यालयांमध्ये ५० पेक्षा जास्त व्यक्तींना बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
No comments
Post a Comment