Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - पोलीस निरीक्षक विकास वाघ याचे निलंबन

No comments

      News24सह्याद्री -कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेला तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि सध्या आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विकास वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पाठवण्यात आलेल्या अहवालानुसार विशेष पोलीस महानिरीक्षकांनी विकास वाघ याचे पोलीस दलातून निलंबन केले आहे. विकास वाघ हा कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असताना त्याने एका महिलेस रिव्हॉल्वर चा धाक दाखवून व मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला असल्याची तक्रार एका महिलेने दिल्यानंतर विकास वाघ याची बदली करण्यात आली होती. 

 मात्र आता विकास वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही तो अद्यापहि फरार आहे . मात्र तो पोलिसांना का सापडत नाही याला कोण पाठीशी घालतंय असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. पोलिसांची प्रतिमा खराब करणाऱ्या विकास वाघ याला पकडून नूतन पोलीस अधीक्षकांनी पोलीस वर्दीतील शान राखावी अशी भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *