Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - पारनेर तहसीलदारांच्या अंगावर गाडी घालणार्‍या आरोपी सोबत पोलिसाने साजरा केला वाढदिवस

No comments

   News24सह्याद्री -


गुन्हेगार आणि पोलिस यांचे अत्यंत जवळचे आणि नाजूक संबंध असल्याचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात आता लपून राहिलेले नाही. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या अंगावर वाळू तस्कराने त्याचे वाहन घातले. त्यांच्यासह कारवाईसाठी गेलेल्या पथकाला धक्काबुक्क केल्याप्रकरणी भाळवणी येथील वाळू तस्कर अक्षय पाडळे, आकाश रोहोकले, बापू सोनवणे यांच्या विरोधात स्वत: तहसीलदार यांनी फिर्याद नोंदविली. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींच्या विरोधात पारनेर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

 उलटपक्षी यातील आरोपी आकाश रोहोकले याच्या वाढदिवसाला पारनेर पोलिस ठाण्यातील सत्यजित शिंदे व अन्य काही पोलिसांनी हजेरी लावली. अत्यंत धुमधडाक्यात या वाळू तस्कराचा वाढदिवस साजरा झाला. पारनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असणारा सत्यजित शिंदे हा वाळू तस्करांचा खबर्‍या आणि पोलिस ठाण्यातील ‘कलेक्टर’ म्हणून ओळखला जातो. शिंदे याच्यासह पारनेर पोलिस ठाण्यातील अन्य दोन कर्मचारीही या वाढदिवसासाठी हजर होते. याशिवाय नगर शहरातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असणारा भाळवणी गावातील पोलिस कर्मचारी देखील हजर असल्याची माहिती हाती आली आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *