Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - नगरमध्ये तडीपार गुंडाने कोवीड सेंटर पेटवून दिले; पोलिस अधीक्षकांना गुंडाची सलामी

No comments

 News24सह्याद्री - नगरमधील मार्केटयार्ड परिसरातील साईस्पंदन कोवीड सेंटरला लाग लावून हॉस्पिटलमधील रुग्ण आणि डॉक्टरांना पेटवून देण्याचा भयानक प्रकार काल रात्री उशिरा घडला. डॉ. रोहित रमेश आहेर यांनी याबाबत कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदविल्यानंतर कोतवाली पोलिसांनी  विजय रासकर, दिपक पवार, ऋषीकेश रासकर, आकाश रासकर, विनायक कुलकर्णी, कृष्णा दळवी आदींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०८, ४३६ ४५२, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, १८८, २६९ आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. या सर्वांनी मिळून सदरचे कोवीड सेंटर बंद करावे या उद्देशाने सेंटरमध्ये अनाधिकाराने प्रवेश करून कोवीड सेंटर समोरील नेटला आग लावून इमारतीमध्ये ती आग पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉॅस्पिटल कर्मचार्‍यांनी ती आटोक्यात आणली. यानंतर या सर्वांनी कोव्हीड सेंटरमधील कोरोनाग्रस्त रुग्ण तसेच स्टाफ यांचे जिवीतास आगीमुळे धोका निर्माण होईल असे वर्तन केले आणि जाणिवपूर्वक नेट जाळली. याशिवाय पार्कीगमधील गाड्यांचे नुकसान करत डॉक्टर तसेच अन्य स्टाफला धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार केला. दरम्यान, या प्रकराने नगरच्या वैद्यकीय क्षेत्रात घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पवार हे करीत असून या प्रकरणातील विजय रासकर आणि ऋषीकेश रासकर या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *