Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - कोरोना लस ‘कोवॅक्सीन’ लशीचा प्राण्यांवर यशस्वी वापर; दुसर्‍या टप्प्याचीही मिळाली परवानगी

No comments

News24सह्याद्री - 



 देशात विकसित होत असलेल्या भारत बायोटेकची करोना लस ‘कोवॅक्सीन’शी निगडीत एक खुशखबर समोर येतेय. ‘कोवॅक्सीन’ लशीचं प्राण्यांवर वापर यशस्वी ठरल्याचं ’भारत बायोटेक’कडून जाहीर करण्यात आलंय. ‘कोवॅक्सीनची प्राण्यांवर झालेल्या चाचणीच्या परिणामांची घोषणा करताना भारत बायोटेकला अभिमान वाटतोय. हा परिणाम लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये सुरक्षात्मक प्रभाव प्रदर्शित करतो’ असं ट्विट भारत बायोटेककडून करण्यात आलंय.


भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद मिळून करोनाविरुद्ध लढण्यासाठी ‘कोवॅक्सीन’ ही लस तयार करत आहेत. ‘भारत बायोटेक’कडून विकसित करण्यात येणार्‍या स्वदेशी ‘कोवॅक्सीन’ ही लस माकडांमध्ये करोना विषाणूविरुद्ध ऍन्टिबॉडीज विकसीत करण्यात यशस्वी ठरल्याचं जाहीर करण्यात आलंय.
 
गैर-मानव सस्तन प्राण्यांवर म्हणजेच माकड, वटवाघूळ आदींवर करण्यात आलेल्या अभ्यासात कोवॅक्सीनच्या रोग प्रतिकारक क्षमतेचा परिणाम दिसून येतो. ‘कोवॅक्सीन’ माकडांमध्ये विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी ऍन्टीबॉडीज विकसित करण्यात यशस्वी ठरल्याचंही भारत बायोटेकनं स्पष्ट केलंय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *