Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - जिल्हाधिकारी कार्यालयातच कोरोनाचा शिरकाव

No comments

  News24सह्याद्री  - जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात काम करणार्‍या दोघा शिपायांना कोरोना संसर्ग झाला असून दोघांचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्याच जोडीने जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानात शिपाई म्हणून काम करणारे अकील शेख यांचा नुकताच मृत्यू झाला. त्यांचे वय ४३ होते. कोरोना संसर्ग झाल्याने व रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार चालू होते. मात्र, उपचार चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आणखी धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील संपूर्ण प्रशासनाची जबाबदारी असणारे उपजिल्हाधिकारी दर्जाचे एक अधिकारी पॉझिटीव्ह आले आहेत. याशिवाय सहाय्यक पुरवठा अधिकारी आणि सहायक नियोजन अधिकारी हे दोन अधिकारीही कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत.

अधिकार्‍यांपासून ते चर्तुर्थश्रेणी कर्मचार्‍यांपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील या सर्वांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *