मुंबईत येणाऱ्यांसाठी १४ दिवस होम क्वारंटाइन राहणे सक्तीचे
कामासाठी बाहेर पडायचे असल्यास दोन दिवस अगोदर महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक
News24 सह्याद्री -
![]() |
| Add caption |
मुंबई ।
सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी साठी आलेल्या पाटण्याच्या पोलीस अधीक्षकांना बृहन्मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केले. त्यानंतर बिहार सरकारने मुंबई मनपावर आरोप केले. यावरून बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी १४ दिवस होम क्वारंटाइन सक्तीचे केले आहे. यासंदर्भात मुंबई मनपाने नवीन आदेश जारी केले आहेत.
मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनं १४ दिवस होम क्वारंटाइन राहणं अनिवार्य आहे. ज्या शासकीय अधिकाऱ्यांना मुंबईत आल्यानंतर कामासाठी बाहेर पडायचं असेल, तर त्यांनी दोन दिवस अगोदर तशी विनंती महापालिकेकडे करावी, असं महापालिकेनं आदेशात म्हटलं आहे.


No comments
Post a Comment