प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण
ट्विट करून दिली माहिती
नवी दिल्ली | News24सह्याद्री -
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक आहे. सर्वसामान्यांपासून ते मोठ्या मंत्र्यांपर्यंत सर्वजण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
इंदौरी यांनी ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार “कोविडची सुरुवातीची लक्षणं आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अरविंदो रुग्णालयात मी उपचार घेत आहे. प्रार्थना करा की लवकरात लवकर मला या आजाराला हरवता येईल. आणखी एक विनंती आहे, कृपया कोणीही मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करू नये, माझ्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला ट्विटर व फेसबुकद्वारे मिळत राहील” असे सांगितले.
YOU MAY ALSO LIKE
Thane


No comments
Post a Comment