भाजपचे आमदारच राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक : नवाब मलिक
मुंबई | News24सह्याद्री -
राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडण्याआधी राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. हे वृत्त फेटाळून लावत राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून माहिती दिली.
नवाब मलिक ट्विट करत म्हणाले “राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपामध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल,विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छुक आहेत".
YOU MAY ALSO LIKE
solapur


No comments
Post a Comment