Breaking News

1/breakingnews/recent

निलेश राणेंचा टीकेला रोहित पवारांचे उत्तर

No comments
शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना साखर कारखान्यांना मदतीसंदर्भात पत्र लिहिले होते.
News24सह्याद्री -


मुंबई :
कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या देशाला बाहेर काढण्यासाठी आणि आर्थिक चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजचा फायदा कोणत्या क्षेत्रांना होईल हे अर्थमंत्रालयाने पत्रकार परिषदेत जाहीर केले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लॉकडाऊन मुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांचा विचार करावा आणि त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी पत्राद्वारे केली.

यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर ट्विटरद्वारे टीका केली. निलेश राणे ट्विट करत म्हणाले " साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर audit झालंच पाहिजे साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्यसरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षो वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा? .

या ट्विटच उत्तर देत आमदार रोहित पवार म्हणाले " मी आपणास सांगू इच्छितो कि शरद पवार साहेबांनी साखर कारखान्यासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबत केंद्राला पात्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदिजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी " असं ट्विट निलेश राणेंच्या टीकेला प्रतिउत्तर दिले.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *