Ahmednagar corona update - 16 जण बरे होण्याची प्रतीक्षा
जिल्ह्यातील 08 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
अहमदनगर | News24सह्याद्री -
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल सकाळी 08 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पुन्हा 09 व्यक्तींचे घशातील स्त्राव घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1546 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1473 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एकूण 43 बाधीत व्यक्तींपैकी 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 16 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोन बाधीत व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

No comments
Post a Comment