Breaking News

1/breakingnews/recent

Ahmednagar Breaking - दारूची दुकाने सुरु करणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी - अण्णा हजारे

No comments
News24सह्याद्री - 

दारुमुळे अनेक गोरगरीब कुटुंब बरबाद झाली. आज लॉकडाऊनुळे गोरगरीब लोकांच्या हाताला काम नाही. त्यांच्या रोजच्या भाकरीचा प्रश्न आहे. काम बंद झाल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही. अशा परिस्थितीत व्यसनाधीन झालेले लोक दारुसाठी अवैध मार्गाचा अवलंब करण्याची शक्यता आहे. अनेक गरीबांच्या घरात दारूवरून कलह निर्माण होऊ शकतील. किंवा गरीब माणसाकडे जे काही थोडेफार पैसे आहेत, ते या संकटकाळात त्याला गरजेचे असताना ते दारूत खर्च होऊन त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता दारूची दुकाने सुरू करण्याचा सरकारचा निर्णय हा योग्य नसून अविचाराने टाकलेले पाऊल आहे. याला विनाशकाले विपरित बुद्धी असे म्हणता येईल, असे ज्येष्ठ साजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *