Breaking News

1/breakingnews/recent

थँक्यू.. हे दोन शब्द तुमचा आमचा प्राण वाचवणाऱ्यांसाठी .. ! ।।special थँक्यू ।।

No comments
News24सह्याद्री - प्रेक्षक हो...! आपणास सुरक्षित ठेवणार्‍या ‘त्यांना’‘थँक यू" बोलू या!
‘थँक यू’ या शब्दात खूप ताकद आणि ऊर्जा आहे. आपल्यासाठी केलेल्या कामातील कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारे हे दोन शब्द!
कोरोनाच्या पार्श्‍वभूीवर लॉकडाऊन सुरू असताना पोलिस, डॉक्टर्स, होमगार्ड, नर्सेस, सफाई कामगारांपासून दुधवाल्यापर्यंत सार्‍यांनीच आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. त्यांनी हे सारे केले ते आपल्यासाठी! त्यामुळेच त्यांचे आभार मानले पाहिजे! तुम्ही या सर्व घटकांना प्रत्यक्ष भेटून आभार मानू शकत नसला तरी आम्ही त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
चला तर मग या सर्वांना ‘थँक यू’ म्हणू या! त्यासाठी आपण एकच करा! घराबाहेर न पडता घरात बसून सहकुटुंब आपला एक फोटो क्लिक करा आणि त्याआधी तुमच्या हातात ‘थँक यू’ असा मजकुर लिहिलेला कागदी फलक घ्या!
तुमचे आभाराचे हे दोन शब्द या संकट काळात आपल्यासाठी काम करणार्‍या प्रशासनाला बळ देणारे ठरणार आहेत.
तुम्ही क्लिक केलेला हा फोटो आम्ही ‘नगर सह्याद्री’ दैनिकात प्रकाशित करू आणि ‘न्यूज 24 सह्याद्री’ या वृत्त वाहिनीच्या माध्यमातूनही दाखवू!
आपला फोटो व्हॉट्सअ‍ॅप द्वारे आमच्या 91 72 10 61 04 या मोबाईल नंबर वर रविवार, दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाठवा!
फोटोसोबत परिवाराचे नाव, पत्ता याचा उल्लेख आवर्जुन करावा.
चला घ्या मोबाईल, करा क्लिक अन् पाठवा आमच्याकडे!
-शिवाजी शिर्के , मुख्य संपादक ,दैनिक नगर सह्याद्री आणि News24 सह्याद्री

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *