Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री update - 'ते' तबलिगी पारनेरच्या कारागृहात

No comments
News24सह्याद्री - कोरोनामुक्त पारनेर तालुक्यात खळबळ


जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढविणार्‍या 26 तबलिगी परदेशी नागरिकांना चक्क पारनेरच्या कारागृहात रवाना करण्यात आल्याने कोरोनामुक्त असलेल्या पारनेर तालुक्यातील नागरिकांचा जीव आता टांगणीला लागला आहे. नगर जिल्ह्यात सुरुवातीला कोरोना रूग्णाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र नगर शहर, नगर तालुका, जामखेड व नेवासा या तालुक्यात आलेल्या परदेशी तबलिगी नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 40 च्या घरात गेली आहे.

हे तबलिगी नवी दिल्ली येथे झालेल्या मरकज कार्यक्रमातून आलेले होते. त्यांनी पर्यटनच्या नावाने व्हीसा मिळवून धर्मप्रसार करण्यासाठी वापर केल्याच्या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. यातील काही जण कोरोनाबाधीत रूग्ण होते. ते बरे झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता या 26 परदेशी तबलिगींना आधी सहा दिवसांची पोलीस कोठडी व नंतर आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मात्र त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नगरच्या कारागृहात न ठेवता पारनेरच्या कारागृहात रवाना केले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या पारनेरकरांच्या उरात धडकी भरली आहे. पर्यटनाचा व्हिसा असताना ते अनधिकृतपणे धर्मप्रसार करण्याचा धक्कादायक प्रकार यापूर्वीच उघडकीस आला आहे. या सर्वांना क्वॉरंटाईन करण्यात आले होते आणि त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यात काही जण पॉझिटीव्हही आढळले होते. आता त्यांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्यानंतर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.

हे विदेशी पाहुणे पारनेरच्या कारागृहात दाखल होताच तेथे आधीच बंदीवान म्हणून ठेवलेल्या कोठडीतील अन्य बंदीवानांसह त्यांच्या नातेवाईकांना धडकी भरली आहे. पारनेरचे कारागृह प्रशासन आता या विदेशी नागरिकांची आणि स्थानिक बंदीवानांची कशी व्यवस्था करतेय याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *