Breaking News

1/breakingnews/recent

कै. मा. खा.दादा पाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अभिलाष घिगे व उपसभापती संतोष म्हस्के

No comments

अहमदनगर । नगर सह्याद्री - कै. माजी खा. दादापाटील शेळके कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अभिलाष घिगे व उपसभापती संतोष म्हस्के यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर आ.अरुण जगताप व माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी सत्कार केला.
गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आ. जगताप, आ.कर्डिले व कोतकर गटाच्या पॅनेलने एकहाती सत्ता मिळविली होती. तसेच पहिल्या सभापती-उपसभापती निवडीच्या वेळी प्रत्येक वर्षी रोटेशनप्रमाणे सभापती- उपसभापती पदाची संधी संचालकांना दिली जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार दोन वर्षांवर येवून ठेपलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूीवर बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींची खांदेपालट करण्यात आली आहे.
सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने हि निवडणुक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्वीजय आहेर यांनी सांगीतले. सभापती-उपसभापतींचा निवडीनंतर माजी आ. शिवाजी कर्डीले, आ. अरुण जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभापती उपसभापती यांनी राजीनामा दिल्यामुळे या पदाच्या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. यामुळे हि निवड करण्यात आली असल्याचे आहेर यांनी सांगीतले.
यावेळी अक्षय कर्डीले,माजी सभापती विलास शिंदे, उपसभापती रेशमाताई चोभे, मीराताई कार्ले, हरीभाऊ कर्डिले, रेवणनाथ चोभे, दिलीप भालसिंग, संतोष कुलट, बन्सी कराळे, बाबासाहेब खर्से, बाळासाहेब निमसे,बाबासाहेब जाधव, वसंतराव सोनवणे, बबनराव आव्हाड, उद्धवराव कांबळे, राजेंद्रकुमार बोथरा, बहिरू कोतकर, रावसाहेब साठे, शिवाजी कार्ले, सचिव अभय भिसे उपस्थित होते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *