Breaking News

1/breakingnews/recent

अन्नधान्याचा तुटवडा पडणार नाही : छगन भुजबळ

No comments

सहा महिने पुरेल इतका अन्नसाठा 


मुंबई । News 24 सह्याद्री -
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन करण्याची घोषणा केली . दि . २४ मार्च रात्री रोजी ८ वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारत २१ दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली .

त्यामुळे अत्यावश्यक गोष्टीचा तुटवडा पडू नये म्हणून लोकांनी भाजीपाला मार्केट , दुकान येथे गर्दी करण्यास सुरवात केली. त्याच पार्श्वभूमीवर सहा महिने पुरेल इतका अन्नसाठा असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हि माहिती दिली तसेच कोणीही अन्नधान्य किंवा भाजीपाल्याचा साठा करून ठेऊ नये असेही त्यांनी संगितलं .

राज्यामध्ये अन्नधान्यचा तुटवडा पडणार नाही ६ ते ८ महिने चालेल एवढा अन्न साठा कोठारांमध्ये असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंविदर्भातील धान्य खरेदीची मुदत ३१ मार्च वरून ३१ मेपर्यंत वाढवून घेतल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

गुढीपाडव्याचा मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला . यावेळी त्यांनी नागरिकांनी घरबाहेर पडू नका घरातच राहा असे आवाहन केले . त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा बंद होणार नाही असेही सांगितले .सर्व आत्यावश्य्क सेवा चालू राहणार आहेत त्यामुळं लोकांनी बाहेर गर्दी करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले .


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *