6 हजारांहून अधिक सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
मुंबई । वृत्तसंस्था -
मोबाईल, इंटरनेट, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि सोशल मीडियाचा वापर करणार्यांची संख्या जितक्या झपाट्याने वाढत आहे, तितक्यात झपाट्याने सायबर गुन्ह्यांच्यात वाढ होत आहे. 2015 ते 2019 या चार वर्षांच्या कालावधीत सायबर गुन्ह्यांत सहा हजारांहून अधिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
राज्यात गेल्या चार वर्षांत 16 हजार 515 सायबर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणांत 6 हजार 20 जणांना अटक करण्यात असून 4 हजार 532 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत दिली. 3 हजार 253 पोलिस कर्मचार्यांना सायबर गुन्ह्यांच्या तपासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सायबर पोलीस ठाण्यांना आधुनिक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर पुरवण्यात आले आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.
No comments
Post a Comment