Breaking News

1/breakingnews/recent

उद्योजक करीम हुंडेकरी अपहरण प्रकरण ; मास्टरमाईंड अझहर शेखच्या मुसक्या आवळल्या

No comments

अहमदनगर । नगर सह्याद्री-  कुख्यात अजहर शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातून अटक केली आहे. प्रतिष्ठित व्यापारी वसीम हुंडेकरी यांचे अपहरण केले होते. अझहर मंजूर शेख (रा. फकीर गल्ली, नगर) हे अटक केलेल्यांचे नाव आहेत.
याबाबत माहिती अशी कि, दि. १८ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटेचेवेळी शहरातील प्रसिध्द उद्योजक अब्दूल करीम सय्यद.(रा. एस. टी. कॉलनी समोर, फकीर गल्ली, अहमदनगर) यांचे अज्ञात इसमांनी २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते.
त्याबाबत फियादी सय्यद अफरोज अब्दूल करीम (वय- ४३ वर्षे, रा. फकीर गल्ली, अहमदनगर) यांनी तोफखाना पो.स्टे. येथे दिलेल्या फ़िर्यादी दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेने दिलीप पवार यांनी त्यांचे पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी नामे निहाल उर्फ बाबा मुशरफ शेख (वय-२० वर्ष, रा. परतूर, जि- जालना) यास त्याचे एका अल्पवयीन साथीदारांसह यापुर्वी ताब्यात घेवून तोफखाना पो.स्टे. ला हजर करण्यात आलेले आहे. गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यातील मुख्य मास्टरमाईंड आरोपी अझहर मंजूर शेख, रा. फकीर गल्ली, अहमदनगर हा पोलीसांना गुंगारा देवून फरार झालेला होता.
आरोपी अझहर शेख हा शिवनी, मध्यप्रदेश येथे एका खेडेगावामध्ये रहात असल्याची माहीती मिळल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी खवासा, शिवनी, मध्यप्रदेश येथे जावून आरोपीचे वास्तव्याची गोपनिय माहीती घेतली असता आरोपी रहात असलेले गाव हे पेंच अभयारण्य परिसरात असल्याची व आरोपी हा दिवसभर अभयारण्यामध्ये आपले अस्तित्व लपवून रात्री पिंपरवाणी, खवासा या गावामध्ये येत असल्याची माहीती मिळाली होती. त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी वेषांतर करुन आरोपी रात्रीचे वेळी मुक्कामी रहात असलेल्या घराची पाहणी केली.
परंतु आरोपी अझहर शेख हा घरी येत नसल्याने दोन दिवस सापळा लावून आरोपी अझहर मंजूर शेख वय-३५ वर्षे, रा. फकीर गल्ली, अहमदनगर यांस मोठ्या शिताीने ताब्यात घेवून अहमदनगर येथे आणून तोफखाना पो. स्टे. ला हजर केले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *