Breaking News

1/breakingnews/recent
। अन्न औषध प्रशासनाची नगर तालुक्यात कारवाई । दीड लाखांचा माल जप्त । एकजण ताब्यात

अहमदनगर । नगर सह्याद्री - दुधात भेसळ होत असल्याचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहमदनगर कार्यालयाने नगर तालुक्यातील भातोडी पारगाव येथील हिरामन शिंदे यांच्या दूध संकलन केंद्रावर गुरुवारी भेसळीचे दूध पकडले आहे.

हिरामन शिंदे हा व्हे पावडर दुधामध्ये भेसळ करून ती दूध डेअरीला पाठवत होता, अशी माहिती सहाय्यक आयुक्त संजय शिंदे (अन्न) यांनी दिली. अन्न सुरक्षा अधिकारी कालिदास शिंदे, सहाय्यक प्रशांत कसबीकर यांनी भेसळीचे नमुने ताब्यात घेत कारवाईत सुमारे दीड लाख रुपयांची भेसळसाठी वापरण्यात येणारी व्हे पावडरीच्या 23 गोण्या आढळल्या. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने भेसळीच्या मुद्देमालासह इतर साहित्य असे दीड लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.
दूध संकलन केंद्रांवर अन्न औषध प्रशासनाचे लक्ष
जिल्ह्यासह दुधात पावडरची भेसळ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यापूर्वीही दुधात भेसळीचे रॅकेट उघड झालेले आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने जिल्ह्यातील दूध संकलन केंद्रांवर लक्ष केंद्रित केले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *