Breaking News

1/breakingnews/recent

कोरमअभावी स्थायीची सभा रद्द

No comments

पुढील आठवड्यात होणार पुन्हा सभा । विविध विषयावरील निर्णय प्रलंबित

अहमदनगर । नगर सह्याद्री -
महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बुधवारी होणारी सभा कोरम अभावी रद्द करण्यात आली. आता ही सभा पुढील आठवड्यात होणार आहे. यासभेमध्ये कै. प्रमोदजी महाजन स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र इमारत भाडे तत्वावर देण्यासह विविध विषयावर चर्चा होणार होती.

विविध विषयावर चर्चा करण्यासाठी बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र स्थायी समितीच्या एका सदस्यांच्या कुटुंबातील विवाह सोहळा असल्याने सर्व सदस्य विवाहाला गेले होते. यामुळे समितीच्या बैठकीला स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख व सदस्य सुवर्णाताई जाधव हे दोन सदस्यच उपस्थित होते. स्थायी समिती कोरमसाठी पाच सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते.

मात्र दोनच सदस्य उपस्थित राहिल्याने कोरम अभावी स्थायी समितीची बैठक रद्द करण्यात आली. आता ही बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. स्थायी समितीच्या सभेमध्ये कै. प्रमोदजी महाजन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शन केंद्र इमारत भाडे तत्वावर देण्याबाबत चर्चा होणार होती. मात्र आता स्थायी समितीतील सर्वच विषयावर आता पुढील आठवड्यात चर्चा होवून निर्णय होणार आहे.
स्पर्धापरीक्षा केंद्राची इमारत भाडेतत्वावर देण्यास विरोध
गोरगरिब, ग्रामीण भागातील तरूण व शेतकर्‍यांच्या मुलांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करता यावा, यासाठी महापालिकेने कै. प्रमोदजी महाजन स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्राची इमारत बांधली आहे. येथे सर्व विद्यार्थ्यांना मोफत सेवा मिळत असून याद्वारे अनेक प्रशासकीय अधिकारी तयार झाले आहेत. मात्र मनपाने ही इमारत भाडे तत्वावर देण्याचा घाट घातला आहे. तरी ही इमारत भाडेतत्वावर देवू नये, अशी मागणी भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्यासह सचिन पारखी, अ‍ॅड. अभय आगरकर, सुनील रामदासी, वसंत लोढा यांनी निवेदनाद्वारे मनपाकडे केली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *