Breaking News

1/breakingnews/recent

कोरोनाच्या भीतीने महिलेची आत्महत्या

No comments

अहमदनगर ।न्युज२४सह्याद्री -
कोरोनो व्हायरसच्या भीतीने महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. शनिवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नगर तालुक्यातील एक महिला काही दिवसांपासून आजारी होती. तिला सर्दी, खोकल्याचा त्रास सुरु होता. त्या महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आढळून आला. कोरोनो व्हायरसच्या भितीने त्या महिलेने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे.

त्या महिलेने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. त्यात नेमका काय तपशील आहे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र कोरोनो व्हायरसच्या भितीने तिने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पाहणी केली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्या महिलेने नेमकी कशामुळे आत्महत्या केली, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *