Breaking News

1/breakingnews/recent

झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची ३१ डिसेंबरला निवडणूक

No comments

अहमदनगर । नगर सह्याद्री – 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षा यांचा कार्यकाळ शुक्रवार (दि.२०) रात्री १२ वा. संपला आहे. नव्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणूक मंगळवार दि.३१ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या शिवाजी महाराज सभागृहात होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व उपाध्यक्षाच्या कार्यकाळाची मुदत शुक्रवार दि.२० डिसेंबरला संपुष्टात आली. यानंतर १० दिवसाच्या आत नव्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणे आवश्यक असते. त्यानुषंगाने अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही मंगळवार दि.३१ डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या शिवाजी महाराज सभागहात होणार आहे.

यावेळी ११ ते १ यावेळेत पीठसन अधिकारी यांच्याकडे उमेदवारी भरण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वा. छाननी झाल्यानंतर माघारी घेण्याची प्रक्रिया होईल. यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *