Breaking News

1/breakingnews/recent

मंत्रिमंडळ विस्तारात ३६ मंत्री शपथ घेणार

No comments

मुंबई । वृत्तसंस्था

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार मंगळवारी होणार आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण ७ मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी २ अशा ६ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. २८ नोव्हेंबरला शपथविधी झाल्यानंतर, १२ डिसेंबरला खातेवाटप झालं होतं.

आता मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी होणार हे निश्चित झाले आहे. यानुसार यावेळी शिवसेनेचे १३, राष्ट्रवादीचे १३ आणि काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिवसेनेचे कॅबिनेट १०, राज्यमंत्री ३, राष्ट्रवादीचे कॅबिनेट १०, राज्यमंत्री ३ तर काँग्रेसचे कॅबिनेट ८ व राज्यमंत्री २ असे मंत्री शपथ घेणार आहेत.

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली होती. दोन्ही पक्षांची विस्ताराची यादी तयार आहे. मात्र काँग्रेसकडून कोणाला मंत्रीपद द्यायची यावरुन खल सुरु आहे. काँग्रेसचे नेते आज दिल्लीला गेले आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले असून ते आज पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठ नेत्यांची दिल्ली दरबारी चर्चा होण्याची चिन्हं आहेत.

सध्या शिवसेनेकडे मुख्यमंत्री, गृह, नगरविकास, उद्योग, कृषी, क्रीडा आणि परिवहन, सार्वजनिक बांधकाम. राष्ट्रवादीकडे अर्थ, गृहनिर्माण, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा. तर काँग्रेसकडे महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण अशी खाती आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *