Breaking News

1/breakingnews/recent

सुपा ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये परप्रांतीयांची नावे

2 comments

पारनेर । नगर सह्याद्री - पारनेर तालुययातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या सुपे ग्रामपंचायत मतदार यादीत ९१ परप्रांतीयांची नावे सामाविष्ट केली असून, कोणत्या पुराव्याच्या आधारे ही नावे सामाविष्ट केली आहेत. याची चौकशी करण्याची मागणी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
तर दुसरीकडे या ९१ परप्रांतीयांपैकी ९ जणांना सुपा ग्रामपंचायतीने त्यांच्या नावावर कोणती प्रकारची जागा नसतानाही घरकुल देण्याचा प्रताप केला आहे. घरकुले पूर्ण नसतानाही ३० हजार रुपयांचा पहिला हप्ता पंचायत समितीच्या वतीने त्यांना वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी तहसीलदारांसह गट गटविकास अधिकार्‍यांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर उपसरपंच ज्योती पवार, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पवार, सुनीता नगरे, उज्वला शिंदे यांच्यासह विशाल पवार, दत्तात्रय पवार, प्रताप शिंदे, प्रवीण पवार, किरण नगरे, बाळासाहेब पवार यांच्या सह्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, पारनेर तालुक्यातील यादी क्रमांक २६७ व २६८ सुपा व पवारवाडी मतदान केंद्र असलेल्या मतदार यादीध्ये ६९२ एकूण मतदार आहेत सदर मतदार यादीमध्ये नावांची तपासणी केली असता, सुपा गावातील किंवा पवारवाडी मधील ९१ परप्रांतीयांचा सामावेश मतदार यादीत आढळून आला आहे. मुळात हे परप्रांतीय बाहेरच्या देशातून आले असून, स्थानिक त्यांना कोणताही पुरावा नसताना मतदान नोंदणी अधिकार्‍यांनी त्यांची मतदार यादीत नाव कोणत्या पुराव्याच्या आधारे सामाविष्ट केले याची चौकशी करण्याची मागणी या निवेदनात केली आहे
त्यामुळे या ९१ लोकांची नावे मतदार यादीतून तातडीने नावे वगळावी व बोगस लाभार्थ्यांची नावे घरकुल मंजूर करणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करावी.अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अजून काही परप्रांतीयांची बोगस मतदार नोंदणी केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

2 comments

  1. हे परप्रांतीय बऱ्याच गावात आहे नगर पुणे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आहे .

    ReplyDelete
  2. त्याची मतदार यादीत नाव घेऊन त्यांची रेशन कार्ड सुद्धा काढले आहेत .

    ReplyDelete

Contact Me

Name

Email *

Message *