शहराची खबरबात
News24सह्याद्री -रस्त्यावर झोपणाऱ्या निराधारांना आ. संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने मिळाली मायेची ऊब ..पहा नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या शहराची खबरबात...
रस्त्यावर झोपणाऱ्या निराधारांना आ. संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने मिळाली मायेची ऊब
थंडीपासून बचाव करायचा असेल तर सर्वच जण निवडतात तो स्वेटर, मफलर अथवा अंगावर पांघरण्याची शाल अन् रग. मात्र, ज्यांच्याजवळ रोजच्या पोटाची खळगी भरण्यासाठी देखील दोन पैसे नाहीत. अश्याना ब्लॅकेट वाटत मायेची ऊब देण्याचे काम राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले.सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी शहरात माळीवाडा बस स्थानक परिसर, स्वस्तिक चौक, स्टेशन रोड परिसरात थंडीची व पावसाची झळ सोसत झालेल्यांच्या अंगावर ब्लकेट पांघरून मायेची उब दिली. अचानकपणे मिळालेल्या या भेटीमुळे गरजवंतांनी आनंद व्यक्त केला. शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे वैभव ढाकणे यांनी केले सर्वानी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन देखील केलं आहे
No comments
Post a Comment