Breaking News

1/breakingnews/recent

11 मार्च फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

     News24सह्याद्री पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास घरोघरी तपासणी....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ओंकारेश्‍वर मंदिर बंद

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर ओंकारेश्‍वर मंदिर महाशिवरात्रीला बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यात येणार नाही. परंतु, भाविकांनी मंदिराच्या बाहेरून महादेवाचे दर्शन घेतले आहे.

2. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

 राज्यात फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत असून दर दिवशी सुमारे 10,ooo नवीन रुग्ण वाढत आहेत. आज राज्यात 98, 859 सक्रिय रुग्ण आहेत. 

3. महावितरणची वीज वसुली पुन्हा जोरात, अधिवेशन संपताच सरकारचा यू टर्न!
अधिवेशनात वीज तोडणी थांबवा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र काल अधिवेशन संपताच आता महावितरणकडून वीज वसुली पुन्हा जोरात सुरु झाली आहे. 

4. सोलापूरच्या शिवसिद्ध बुळ्ळाच्या धक्कादायक करामती

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या शिवसद्ध बुळ्ळा याच्या घर झडतीत सापडलेल्या कागदपत्रातून नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी शिवसिद्ध बुळ्ळा याच्या घरात आढळलेल्या एका कागदपत्राद्वारे 2015 च्या प्रकरणात देखील त्याला आरोपी करण्यात आले आहे. 

5. IRCTC च्या कर्मचाऱ्याला अटक

बहुजननामा ऑनलाइन – रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालणा-या टोळीचा अंबरनाथ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 


6. अमरावतीच्या 11 प्रयोगशाळांची मान्यता रद्द : आरोग्यमंत्री

अकोला, अमरावती तसेच वाशिम जिल्हात बोगस आरटीपीसीआर चाचण्यांसदर्भात  कोणत्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. अमरावती जिल्ह्यात रॅपिड अ‍ॅन्टीजेन चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालात तपासणीमध्ये तफावत आढळून आली आहे. 


7. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास घरोघरी तपासणी

वाशिम : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ज्या गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील तेथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. 


8. आमदारांसाठी खुशखबर: कोरोनामुळे कात्री लागलेला निधी पुन्हा वाढणार

 राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या पगारात 30 टक्के कपात करण्यात आली होती. मात्र आता ही कपात रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली. 


9. गोव्यात महादेवाच्या अभिषेकासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा

गोवा राज्यात महाशिवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणच्या श्रीशंकर महादेवच्या देवस्थानात अभिषेक करण्यासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा लागल्या आहेत.


10. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची लस घेणार

राज्यात कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाची लस घेणार आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *