Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - रेखा जरे पाटील यांचे दोन्ही मारेकरी पकडले; हत्या सुपारी देऊनच!

No comments

 News24सह्याद्री -




सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेखा जरे  पाटील यांच्या मारेकर्‍यांचा शोध लावण्यात आणि त्यांना अटक करण्यात नगर पोलिसांना यश आले आहे. सुपारी देऊनच सौ. रेखा जरे पाटील यांचा खून करण्यात आल्याचं उघड झालंय.अवघ्या चोवीस तासात मारेकर्‍यांना जेरबंद करण्यात नगरच्या पोलिसांना यश आलंय.यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या सौ. रेखा जरे पाटील यांचा पुणेहून नगरला येत असताना सोमवारी रात्री आठच्या सुमारास जातेगाव घाटात खून करण्यात आला होता. त्या स्वत: चार चाकी वाहन चालवत होत्या.दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची गाडी घाटात अडवली. शाब्दीक चकमकीचे नाटक झाले. या दरम्यान एक मारेकरी त्यांच्या गाडीसमोर आडवा उभा राहिला आणि दुसर्‍याने जरे यांच्यावर चाकूने वार केले. त्यांच्या गळ्याला मोठी जखम झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.सदरची घटना ही गाडीला कट मारला या किरकोळ कारणातून घडल्याची चर्चा झडत होती. मात्र, न्यूज २४ सह्याद्रीने ही चर्चा घटना घडल्याच्या क्षणापासून फेटाळली होती. जरे पाटील यांचा खून प्रीप्लॅन मर्डर आहे, असं आम्ही ठामपणे सांगत होतो. अखेर आमचा हा दावा खरा ठरलाय!जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सदर घटनेबाबत स्वत: लक्ष घातले. विविध अंगांनी तपासाची यंत्रणा हलवली.

 जरे पाटील यांच्या संपर्कात असणारांचा शोध घेतला. स्थानिक गुन्हे शाखेसह तीन पोलिस ठाण्यांची पथके तयार करण्यात आली. गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या टीमला आरोपी पकडण्यात यश आलय.जरे यांची हत्या करणारे दोन्ही आरोपी हे राहाता तालुक्यातील कोल्हार येथून ताब्यात घेण्यात आले आहेत. या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलीय. रेखा जरे यांचा खुन सुपारी घेऊन करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिलीय. दोघांच्याही मुसक्या गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके व त्यांच्या टीमने आवळल्या आहेत.कोल्हार येथून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर लागलीच पोलिसांनी केडगाव उपनगरातून भिंगारदिवे यास ताब्यात घेतलंय. भिंगारदिवे याच्या संपर्कात आणखी काही जण होते. त्यात नगर शहरातील मोठं प्रस्थ असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिलीय!रेखा जरे पाटील यांचं हत्याकांड सुपारी देऊन झाल्याचं पोलिसांनी उघडकीस आणलंय! पोलिसांनी आतापर्यंत या हत्याकांडाशी संबंधीत तीघांना ताब्यात घेतलंय. पोलिसांची एक टीम पुण्यात तपास करत आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या विश्‍वासातील खास पथक जरे पाटील यांच्या संपर्कात असणार्‍यांच्या डिटेल्स मिळवत आहेत.

अखेर जरे पाटील यांचे हत्यारे पकडण्यात पोलिसांना यश आलंय! आताच्या घडीची ही मोठी बातमी आहे. हत्यारे पकडण्यात आले असले तरी या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार आम्ही अद्याप ताब्यात घेतला नसल्याचं अधिकृत सुत्रांनी सांगितलंय! याचाच अर्थ या घटनेचा मास्टरमाईंड वेगळाच आहे. हा मास्टरमाईंड कोण याची उत्सुकता आता सर्वांनाच लागलीय! याबाबत स्वत: पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्याकडून काय खुलासा होतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.रेखा जरे पाटील यांचे हत्याकांड सुपारी देऊन केल्याचा आम्ही करीत आलेला दावा अखेर खरा ठरलाय! जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील साहेब, आपले आणि आपल्या संपूर्ण टीमचं अभिनंदन! साहेब, आरोपी पकडले असले तरी यातील मास्टरमाईंडही तुमच्या जाळ्यात येईल ही खात्री आहेच

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *