Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - फुटपाथवर झोपलेल्या तिघांना आयशर टेम्पोने चिरडले ...

No comments

      News24सह्याद्री -   




नगर-सोलापूर महामार्गावर शहरानजीक असलेल्या चांदणीचौकात रस्त्याच्या फुटपाथवर झोपलेल्या तीन बूट विक्रेत्यांना रात्रीच्या सुमारास आयशर टेम्पोने चिरडले, या अपघातात एक निद्रिस्त बूट विक्रेता जागेवरच ठार झाला. इतर दोघे बूट विक्रेते तसेच टेम्पोतील दोन जन असे एकूण चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हि घटना रात्री दोनच्या सुमारास झाल्याचं समजतंय.

तर यात  मेहताब शेख असं  जागेवरच मृत्यू झालेल्या व्यक्तीच नाव आहे , तर मुसाईद शेख  , जावेद शेख हे दोघे जखमी झाले आहेत. सोलापूरहून नगर च्या दिशेने येत असलेला एक मालवाहू आयशर टेम्पोच्या चालकाचे नियंत्रण चांदणी चौकातील आरटीओ ऑफिस जवळ सुटल्याने हि दुःखद घटना घडली .तर  याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत....

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *